शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:03 IST

पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली.

ठळक मुद्देजलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची केली कारवाई पालिकेला थेट घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांकडे धाव

पुणे : पालकमंत्री म्हणून पुण्याच्या पाण्यावर घेतलेली भूमिका भाजपा शिवसेना युतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांना महाग पडण्याची चिन्हे  आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बापट यांना पाणी विषयावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून निवडणुकीच्या रिंगणात घेरण्याची चिन्हे आहेत. पुण्याचा पाणी कोटा वाढवून देण्याचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. तो वाढवून मिळत नाही व मिळते आहे ते पाणी पुरत नाही अशी पुण्याची स्थिती आहे. त्यावर पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांना जास्त पाणी लागते अशी एकदा नव्हे तर अनेकदा टीका केला. त्याही वेळी पुणेकरांची बाजू घेण्याऐवजी बापट यांनी काहीच भूमिका न घेता मौन बाळगणे पसंत केले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यावरून त्याचवेळी बापट यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले होते.त्यानंतरही कालवा समितीच्या बैठकीत पुण्यावर पाण्यासाठी अन्याय होत असताना बापट व भाजपाचेही आमदार शांत बसले. परतीच्या पावसावर भरोसा ठेवून गरज नसताना धरणातील पाणी कालव्यात सोडले गेले त्यालाही बापट यांनी कधी हरकत घेतली नाही, उलट त्यांच्याच संमतीने दौंडचे आमदार राहूल कूल यांच्या मदतीसाठी म्हणून पाणी सोडले जात असल्याचे बोलले जात होते, त्याला बापट यांनी कधीच हरकत घेतली नाही. आता अमदार कूल यांच्या पत्नी कांचन बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार असल्यामुळे बापट त्यावेळी शांत का बसले होते याचा उलगडा होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. आता लोकसभेला बापट भाजपाची उमेदवारी करत असताना नेमक्या पाण्याच्याच मुद्द्यावर त्यांना कचाट्यात पकडण्याची आघाडी रणनिती आहे. लोकसंख्येच्या आधारावर पुण्याचा पाणी कोटा जलसंपदाकडून वाढवून घेण्याची मागणी होत असताना त्यावर बापट यांनी काहीच केले नाही. जलसंपदाकडून लोकसंख्येचे पुरावे द्या, आधारकार्ड सादर करा, तरंगत्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारी द्या असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पालिकेला त्रासच दिला गेला आहे. तसेच जलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची कारवाई केली तरीही बापट यांनी त्यावर काहीच केले नाही. पालिकेला थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली. हे सर्व मुद्दे प्रचारात उपस्थित करून बापट यांना घेरण्याचा विचार आघाडीत सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक