शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; प्रमोद कोंढरेंचा शहराध्यक्षांकडे राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:50 IST

प्रमोद कोंढेरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सगळ्या पदातून मुक्त करण्याची मागणी शहराध्यक्षांकडे केली आहे

पुणे : पुणे शहरात भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यावर महिलापोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन आणि विनयभंगाचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रमोद विठ्ठल कोंढरे (महामंत्री, भाजप पुणे शहर) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय आणि पोलिस वर्तुळातही प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावरून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी भाष्य केलं आहे. कोंढरे यांनी माझ्याकडे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

घाटे म्हणाले, प्रमोद कोंढेरे यांनी काल स्वतः या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मला सगळ्या पदातून मुक्त करा अशी मागणी केली होती.  त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे आणि आम्ही तो स्वीकारला आहे. या सगळ्या प्रकरणी पोलीस प्रशासन योग्य ती चौकशी करेल. चौकशीच्या नंतर जे काही निष्कर्ष निघतील त्या निष्कर्षानंतर भाजप योग्य ती कारवाई करेल. त्या कार्यक्रमाला मी नव्हतो मात्र तिथे गर्दी होती त्यामुळे अनावधानाने हे घडलं आहे का? याची माहिती घ्यावी लागेल आणि मगच चौकशी करावी लागेल पोलीस या विषयाचा योग्य त्या पद्धतीने तपास करतील.

घटना कशी घडली?

ही घटना सोमवारी (२३ जून) दुपारी १.३० वाजता पुण्यातील कसबा पोलीस चौकी परिसरात घडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्यानिमित्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी काही भाजप पदाधिकारी स्थानिक चहाच्या टपरीवर थांबले होते. त्याच ठिकाणी महिला पोलिस अधिकारी ड्युटीवर होत्या. प्रमोद कोंढरे हे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्का दिला आणि तिच्याशी कथितरित्या गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण