धनकवडी : राजकीय वर्तुळात सत्ताधारी नेत्यांसंदर्भात अनेक गुन्हेगारीची प्रकरण ताजी असताना आता पुण्याात भाजपचा पदाधिकारी थेट जुगार अड्ड्यावर आढळल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. पुणेपोलिसांनी जुगार अड्ड्या वर छापा टाकला असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे, कांबळे याच्यासोबत इतर २ ते ३ जणं हे जुगार खेळत असताना पोलिसांनील छापा टाकला. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औदुंबर कांबळे हा पर्वती विधान सभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने छापा टाकला असता ते सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आलं. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे
सात जणांवर कारवाई
संग्राम दिलीप भोसले, मंगेश मारुती शेलार, युवराज नानासाहेब सुर्यवंशी, सागर नारायण अडागळे, बापू लक्ष्मण पाटोळे, रोहन शेखर लोंंढे, औदुबर विठ्ठल कांबळे या सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.