शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपा-राष्ट्रवादीच्या मैत्रीचा 'पुणे पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 00:17 IST

Pune : राजकीय मैत्रीचे नवे उदाहरण. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात भाजपचा झाला पाहुणचार. 

ठळक मुद्देराजकीय मैत्रीचे नवे उदाहरण. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात भाजपचा झाला पाहुणचार 

पुणे : पुण्यातील राजकीय घडामोडी आणि सत्ता समीकरणांची देश पातळीवर नेहमीच चर्चा होत असते. राजकीय मतभेद असले तरी एकमेकांप्रती सद्भाव आणि मैत्री जपणारे शहर म्हणून पुण्याची ख्याती आहे. त्याचाच प्रत्यय पुणेकरांना पुन्हा आला. राष्ट्रवादीच्या नूतन शहर कार्यालयाला भाजपाच्या खासदार, शहराध्यक्ष, महापौर यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांसह भेट देत राष्ट्रवादीचा पाहुणचार घेतला. यावेळी हलक्या-फुलक्या वातावरणात राजकीय गप्पाही रंगल्या होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन कार्यालय महापालिकेजवळ आणण्यात आले आहे. या कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित लवकर यांच्या हस्ते नुकतेच झाले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच भेट दिली आहे. या कार्यालयाला भेट देण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीकडून भाजपाला देण्यात आले होते. त्याचा स्वीकार करून खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच शहर पदाधिकारी यांनी कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पालिकेच्या निवडणुका आगामी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणूका जवळ आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपाकडून राज्य सरकार आणि मंत्री 'टार्गेट' केले जात आहेत. तर, राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपाला 'शह' देण्यास सुरुवात केली आहे. 

अशा राजकीय गदारोळात भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात हलक्याफुलक्या गप्पा झाल्या. यासोबतच एकमेकांना कोपराखळ्याही मारण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या या भेटीमुळे पुण्यातील या राजकीय मैत्रीची चर्चा रंगू लागली आहे.

निव्वळ भेट की भविष्यातील 'पुणे पॅटर्न'ची पुनरावृत्ती?भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला दिलेली भेट ही केवळ औपचारिक होती का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी-भाजपा असा सत्तेचा 'पुणे पॅटर्न' राज्याने अनुभवलेला असल्याने ही निव्वळ सदिच्छा भेट होती की भविष्यातील 'पुणे पॅटर्न'ची रंगीत तालीम होती अशी चर्चाही रंगू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसgirish bapatगिरीष बापटSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार