शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
4
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
5
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
6
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
7
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
8
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
9
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
10
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
11
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
12
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
13
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
14
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
15
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
17
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
18
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
19
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
20
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

2024 ला स्वबळावर भाजपचं सरकार येईल, चंद्रकांत पाटलांनी सुरू केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 8:46 PM

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता पाटील यांनी सडकून टीका केली. नाव मोठं लक्षण खोटं, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता पाटील यांनी सडकून टीका केली. नाव मोठं लक्षण खोटं, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले.

मुंबई - गेल्याच आठवड्यात शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल अतिशय आशावादी विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. पुढील निवडणुकांमध्ये भाजपसोबत कोण असेल, कोण नसेल याबद्दल पाटील यांनी अतिशय स्पष्ट विधान केलं आहे. तसचे, 2024 विधानसभा होईल, तेव्हा सरकार स्वबळावर येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता पाटील यांनी सडकून टीका केली. नाव मोठं लक्षण खोटं, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे. ५६ आमदार असताना ते मुख्यमंत्री झाले आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. तसेच, आगामी निवडणुका जेव्हा होतील, कधी होतील हे मला माहिती नाही. मी भविष्यवेत्ता नाही, राजकीय जाणकार आहे. त्यामुळे, जेव्हा 2024 ला विधानसभा होईल, तेव्हा स्वबळावर आपलं सरकार येईल,  अशी तयारी सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितलं. तसेच, आता युतीमध्ये कुणी नको असेही ते म्हणाले. 

पाठीत खंजीर खुपसणारे कोण?

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल. आम्हाला युतीत कोणीही नको, असं म्हणत पाटील यांनी युतीबद्दल महत्त्वाचं विधान केलं.

''मोदी आमचे आई-बाप''

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं निवडून यायचं आणि मग त्यांच्यावरच उठता बसता टीका करायची असा उद्योग सुरू आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावानं शिमगा सुरू होतो. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

फडणवीसांनीही सांगितलं होतं मिशन 2024

पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्या आशा बुचके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना, मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला, असा आरोप त्यांनी केला होता. आशा बुचकेंच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना फडणवीस यांनी युतीमध्ये आम्हाला त्रास झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आता मोकळा श्वास घेत असून 2024 मध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता आणू, असेही त्यांनी म्हटले होते.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे