शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Pune Police: आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील 'त्या' आरोपीकडून बीडमधील घोटाळे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 20:37 IST

राज्यभरात गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील बीडमधील दलाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला

पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील बीडमधील दलाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे सायबर पोलिसांचे पथक बीडमध्ये गेले होते. मात्र, तो पुण्यात आल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून बुधवारी अटक करण्यात आली. आरोपी हा  भाजपचा पाटोदा युवा मोर्चाचा अध्यक्ष संजय सानप याचा नातलग असल्याचे समोर आले आहे. अतुल प्रभाकर राख (रा. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

परीक्षेपूर्वी त्याने बीडमधील उमेदवारांना एकत्रित करून प्रश्नोत्तरे पाठांतर करून घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याशिवाय परीक्षेत पात्र होण्यासाठी फरारी दलाल जीवन सानप याच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्यांनाएकत्रित करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि ’ड’ अशा दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाटोदा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष संजय सानप  (वय ४०, रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अटक केली होती. त्याचा भाऊ जीवन सानप हा फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.  आता त्याचा नातलग दलाल अतुल राख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय ‘ड' परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र सानप याला अटक केली होती.  त्याच्या माहितीनुसार पाटोदा भाजपाच्या युवा मोचार्चा माजी अध्यक्ष संजय सानप याचा  सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर  पुणे पोलिसांच्या सायबर पथकाने त्याला अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, एसीपी विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, उपनिरीक्षक अमोलवाघमारे, उपनिरीक्षक अनिल डफळ, उपनिरीक्षक पडवळ यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यPoliceपोलिसArrestअटक