Saswad Nagar Parishad Election Result 2025: सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी काकी जगताप विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:36 IST2025-12-21T11:35:46+5:302025-12-21T11:36:10+5:30

Saswad Local Body Election Result 2025: आमदार विजय शिवतारे गट विरुद्ध माजी आमदार संजय जगताप गट म्हणजेच शिंदे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत झाली

BJP flag in Saswad Municipality; Mayor candidate Anandi Kaki Jagtap wins | Saswad Nagar Parishad Election Result 2025: सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी काकी जगताप विजयी

Saswad Nagar Parishad Election Result 2025: सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी काकी जगताप विजयी

सासवड : नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार सचिन भोंगळे यांचा भाजपच्या उमेदवार व माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदीकाकी जगताप यांनी १,०९१ मतांनी पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. आनंदीकाकी जगताप यांना ११,३६२ मते मिळाली, तर सचिन भोंगळे यांना १०,२७१ मते मिळाली. उबाठा शिवसेनेचे उमेदवार अभिजित जगताप यांना केवळ ६८२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार निकिता धोत्रे यांना ९८, तर ‘नोटा’ला १४४ मते मिळाली. या निवडणुकीत माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला.

पुरंदर तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी सासवड नगरपालिकेची निवडणूक बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अत्यंत चुरशीची ठरली. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. भाजपच्या कमळ चिन्हावर लढवली जाणारी ही पहिलीच नगरपालिका निवडणूक असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सोबत संधान बांधत सर्व प्रभागांत उमेदवार दिले होते. मात्र, राष्ट्रवादीने प्रत्यक्ष लढतीत शरणागती पत्करल्याने बहुतांश ठिकाणी भाजप व शिवसेना यांच्यात थेट दुरंगी सामना रंगला. दरम्यान, २२ पैकी भाजप १३, तर शिवसेनेने (शिंदे गट) ८ जागांवर विजय मिळवला असून एक जागेची निवडणूक न्यायालयाच्या निकालामुळे प्रलंबित आहे.

सासवड नगरपालिकेवर आपलीच सत्ता यावी, यासाठी शिवसेनेने नगराध्यक्षपदाचा उमेदवार तब्बल महिनाभर आधी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, तर भाजपच्या प्रचारासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रभारी आमदार योगेश टिळेकर यांनी सभा घेतल्या होत्या.

नगरसेवक पदाचे प्रमुख निकाल

सासवड नगरपालिकेच्या विविध प्रभागांमध्ये भाजप व शिवसेनेत अटीतटीच्या लढती झाल्या. भाजपने अनेक प्रभागांत वर्चस्व राखत महत्त्वाच्या जागा जिंकल्या, तर शिवसेनेनेही काही प्रभागांत जोरदार प्रतिकार करत विजय मिळविला. प्रभाग क्रमांक ४ (ब) मधून भाजपच्या स्मिता सुहास जगताप या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्रमांक ५, ७ आणि ८ मध्ये शिवसेनेने महत्त्वाचे विजय मिळवले, तर प्रभाग क्रमांक ६, ९, १० आणि ११ मध्ये भाजपने आपले बळ दाखविले.

विजयी उमेदवार

प्रभाग १ माधुरी राऊत, मनोहर जगताप
प्रभाग २ लीना वढणे, बाळासाहेब भिंताडे

प्रभाग ३ शीतल भोंडे, ज्ञानेश्वर (माऊली) जगताप
प्रभाग ४ सोपान रणपिसे, स्मिता जगताप (बिनविरोध)

प्रभाग ५ रत्ना म्हेत्रे, मंदार विजय गिरमे,
प्रभाग ६ अर्चना जगताप, राजन भय्या जगताप

प्रभाग ७ स्मिता जगताप, वैभव टकले
प्रभाग ८ प्रीतम म्हेत्रे, दीपाली जगताप

प्रभाग ९ प्रदीप राऊत विजयी, प्रियांका जगताप
प्रभाग १० ज्ञानेश्वर गिरमे, शिल्पा जगताप

प्रभाग ११ अजित जगताप

Web Title : सासवड नगर परिषद चुनाव में बीजेपी की जीत; आनंदी जगताप अध्यक्ष निर्वाचित

Web Summary : पुणे के सासवड नगर परिषद में बीजेपी ने जीत हासिल की। पूर्व विधायक संजय जगताप की मां आनंदी जगताप अध्यक्ष पद पर विजयी रहीं। महायुति गठबंधन के भीतर प्रतिस्पर्धा के बावजूद, बीजेपी संजय जगताप के हाल ही में पार्टी में शामिल होने से लाभान्वित हुई।

Web Title : BJP Wins Saswad Nagar Parishad Election; Anandi Jagtap Elected President

Web Summary : BJP secured victory in Saswad Nagar Parishad, Pune. Anandi Jagtap, mother of ex-MLA Sanjay Jagtap, won the president post. Despite internal competition within the Mahayuti coalition, BJP emerged victorious, benefiting from Sanjay Jagtap's recent party entry.