शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
3
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
4
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
5
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
6
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
7
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
8
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
9
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
10
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
11
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
12
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
13
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
14
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
15
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
16
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
17
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
18
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
19
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
20
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

"भाजप राजकीय फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर करते राज्य शासनालाच बदनाम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 16:48 IST

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप, तर मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी त्यांची स्पष्ट भूमिका

ठळक मुद्देकेंद्राने घटनादुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसींची जातनिहाय स्वतंत्र जनगणना करा

पुणे: मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाज आणि ओबीसींची देशपातळीवर जातनिहाय जनगणना केल्यास सर्वांनाच न्याय मिळेल. परंतु राज्यातील भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा घेण्यासाठी दोन्ही समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनाला बदनाम करत आहे. असा आरोप राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी विनंती करतच राज्यातील प्रत्येक जात, घटकाला आपल्या न्याय, हक्क, आरक्षण आदी विविध मागण्यांसाठी लढण्याचा अधिकार असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

अभय बंग महान जगव्यापी सामाजिक नेते

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार आणि तुमच्यावर टीका केली. या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, अभय बंग हे महान सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अफाट प्रयत्नामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्यामुळे एकही माणूस तंबाखू अथवा सिगारेट पित नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची मिश्किल टिपणी त्यांनी यावेळी केली. 

रस्त्यावर बसणाऱ्या वि'स्मृती'बाई सध्या कुठे आहेत ?

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ६०-७० रुपये पेट्रोल असताना भाजपच्या स्मृती इराणी या रस्त्यावर बसून आंदोलन करत होत्या. आता त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना पेट्रोलचे भाव १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्यावर आता त्या वि'स्मृती'बाई कुठे आहेत. त्या बोलत नाहीत. आता त्या कुठे गायब झाल्या आहेत. आम्हाला सापडल्या की त्यांना याबाबत आम्ही आठवण करून देऊ, असा हल्ला वडेट्टीवार यांनी केला.

लोणावळ्यात ओबीसींचा राज्यस्तरीय मेळावा घेणार

राज्यातील ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी तसेच समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी येत्या २६ आणि २७ जूनला लोणावळा येथे मेळावा घेणार आहे. त्यात विविध गोष्टींची चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMLAआमदार