शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

उमेदवारी बापटांना ; साेशल मीडियावर काैतुक शिराेळेंचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 3:54 PM

उमेदवारी जरी बापट यांना जाहीर झाली असली तरी साेशल मिडीयावर शिराेळेंच्या पक्षनिष्ठेचे काैतुक हाेत आहे.

पुणे : पुण्यातील लाेकसभेच्या जागेवर भारतीय जनता पार्टीकडून काेणाला उमेदवारी जाहीर हाेणार याची चर्चा सर्वत्र सुरु हाेती. या चर्चांना शुक्रवारी रात्री पुर्णविराम मिळाला. शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झालेल्या यादीत पुण्याच्या जागेसाठी गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपाचे पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळे यांचा पत्ता यामुळे कट झाला आहे. ही उमेदवारी जाहीर हाेताच साेशल मिडीयावर सुद्धा चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवारी जरी बापट यांना जाहीर झाली असली तरी साेशल मिडीयावर शिराेळेंच्या पक्षनिष्ठेचे काैतुक हाेत आहे. 

शुक्रवारी बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे भाजपाच्या पक्ष कार्यालयात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले हाेते. सकाळीच शिराेळे यांनी बापट यांना फाेन करुन शुभेच्छा दिल्या हाेत्या. बापट यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शिराेळे दिल्लीला हाेते, तेथून आल्यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यालयात येत बापट यांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करीत राहीन. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेन. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावर साेशल मिडीयावर शिराेळे यांचे काैतुक केले जात आहे. तर बापट यांना काही प्रमाणात ट्राेल देखील केले जात आहे. 

2014 साली गाेपिनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव शिराेळे यांना उमेदवारी देण्यात आली हाेती. त्यामुळे यंदा उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिराेळे हे मुंडे समर्थक असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली असा सूर साेशल मिडीयावर एकीकडे उमटत हाेता. तर दुसरीकडे पक्षाने घेतलेला निर्णय शिराेळे यांनी स्वीकारल्याने त्यांचे काैतुक करणाऱ्या पाेस्ट आणि कमेंट्ससुद्धा फिरत हाेत्या. काॅंग्रेस- राष्ट्रवादीचे काही नेते उमेदवारी न मिळाल्याच्या कारणाने भाजपात प्रवेश करत असल्याने शिराेळे यांनी पक्षनिष्ठा दाखवून पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेचे काैतुक करण्यात आले. तर दुसरीकडे बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या पाेस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत. काॅंग्रेस कुठला उमेदवार देईल त्यावर बापट निवडून येतील की नाही याचा निर्णय हाेईल या पासून ते पुण्यात भाजपा एक लाेकसभा निवडणूक जिंकल्यानंतर दुसरी हरते हा पुणे पॅटर्न असल्याचे म्हणत बापट निवडून येणार नाहीत असे मत व्यक्त केले. तर काहींनी बापट यांना नाही तर माेदींना पाहून मत देणार असल्याचेही म्हंटले आहे. 

गिरीश बापट यांना देण्यात आलेली उमेदवारी आणि अनिल शिराेळे यांनी दाखवलेली पक्षनिष्ठा यावर साेशल मिडीयावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया - पुणेकर तुम्हाला निवडणूक हरवल्यानंतर वाजत गाजत घरी सोडून येईल .- याला म्हणतात पक्षाचे प्रामाणिक नेते- मुंडे साहेबांचे समर्थक एवढच गडकरी यांनी पत्ता कट केला. बापट पडणार १००%- खरच खूपच सुंदर ..खासदार- तुम्ही खूप काम केलात प्रामाणिकपणाने म्हणून उमेदवारी नाकारली... जनतेची कामे तुम्ही करु शकलात नाहीत.- सलाम शिरोळे साहेब. तुम्ही खरंच ग्रेट आहात. हीच खरी भाजपाची विचारधारा- निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता

टॅग्स :girish bapatगिरीष बापटanil shiroleअनिल शिरोळेBJPभाजपाPuneपुणे