शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत भाजप नगरसेवकाची डॉक्टरांना धक्काबुक्की व शिवीगाळ, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:05 IST

भाजप नागरसेवकावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा पवित्रा..

ठळक मुद्देरविवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

 भोसरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रविवारी दीडच्या सुमारास रात्री भाजप नगरसेवकाने डॉक्टरांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदवत वायसीएममधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत संबंधित भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रविवारी दोन रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. या कारणावरून त्यानंतर रात्री पिंपरीतील भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी रुग्णालयात येत धिंगाणा घातला तसेच डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा डॉक्टरांनी केला.

कोविडसारख्या महामारीच्या काळात देखील आम्ही जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण सारखा प्रकार आमच्या बाबत घडतो हे निंदनीय आहे असे सांगत सोमवारी सकाळपासून वायसीएममधील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.    दरम्यान, रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी वायसीएममधील वरिष्ठ डॉक्टरांना अनेदा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी आज सकाळी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित भाजप नगरसेवक संदीप वाघेरे याांच्यावर जो पर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे वायसीएममधील रुग्णांवर होणारे उपचार थांबविण्यात आल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

याची माहिती समजताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि संतोष पाटील वायसीएमकडे रवाना झाले . त्यांनी डॉक्टरांची बाजू एकूण घेतली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर