भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:02 IST2020-09-06T00:02:26+5:302020-09-06T00:02:37+5:30
जगदिश मुळीक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून माहीती दिली.

भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण
चंदननगर: पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण झाली. यासंबंधित जगदिश मुळीक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून माहीती दिली.
जगदिश मुळीक यांना आज सकाळी कोरोनाची प्राथमिक लक्षण जाणू लागल्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ते पुढील उपचारासाटी रूग्णालयात दाखल झाले असल्याचे सोशल मिडीयाद्वारे सांगितले.