Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:05 PM2021-10-07T14:05:39+5:302021-10-07T14:07:02+5:30

भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे.

Bjp : Chitra Wagh promoted to BJP, appointed to National Executive in bjp by j.p. nadda | Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती

Bjp : चित्रा वाघ यांना भाजपमध्ये बढती, राष्ट्रीय कार्यकारिणीत नियुक्ती

Next
ठळक मुद्देचित्रा वाघ ह्या गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये सर्वाधिक आक्रमक महिला नेत्या असल्याचं दिसून येतं. सत्ताधिऱ्यांना थेट भिडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. आदिवासीमंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील प्रकरणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले. या यादीत एकूण 18 जणांनी नावे असून महाराष्ट्रातून 2 महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना यापूर्वीच राष्ट्रीय कार्याकारिणीत घेण्यात आले आहे. आता, चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली आहे.

भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपकडून चित्रा वाघ यांना बढती मिळाल्याचं दिसून येतं. तसेच, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे.  

चित्रा वाघ आक्रमक दिसल्या

चित्रा वाघ ह्या गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये सर्वाधिक आक्रमक महिला नेत्या असल्याचं दिसून येतं. सत्ताधिऱ्यांना थेट भिडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. आदिवासीमंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील प्रकरणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातूनच, राठोड यांना मंत्रीपद सोडावे लागले. तसेच, राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांच्यावरील आरोपातही त्या आक्रमकपणे राष्ट्रवादीविरोधात पुढे आल्या होत्या. चित्रा वाघ यांच्या या कार्याची दखल घेऊन, देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती झाल्याचे समजते. 
 

Web Title: Bjp : Chitra Wagh promoted to BJP, appointed to National Executive in bjp by j.p. nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app