शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

भव्य मिुरवणुक,जोरदार घोषणाबाजी यांनी पुण्यात भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:17 IST

लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. ही विचारांची लढाई मी लढणार आहे.

ठळक मुद्देभाजपासह महायुतीच्या मेदवारांच्या समर्थनार्थ भव्य मिरवणुक

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट व बारामती मतदारसंघासाठी कांचन कुल यांनी उमेदवारी अर्ज भरले. यावेळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बापट व कुल यांच्या समर्थनार्थ भव्य मिरवणुक काढत मला कशाची भीती, माझ्या मागे आहे महायुती..कोण आले रे कोण आले यांसारख्या जोरदार घोषणा दिल्या..  यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, भीमराव तापकीर, आदी नेते उपस्थित होते.  आगामी लोकसभेत पुण्यात गिरीश बापट यांची काँग्रेसचे मोहन जोशी तर बारामती मतदार संघातून कांचन कुल यांची राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याशी लढत होत आहे.  यावेळी बापट म्हणाले, मी जेव्हा लढायला उतरतो, तेव्हा मला कुठलीच लढाई अवघड नसते, आत्तापर्यंत नऊ लढाया मी जिंकलो त्यात आणि दोन लढायात फार कमी मताने मी पडलोय. लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. चांगला विचार, प्रगती, विकास त्याचे नाव फक्त फक्त मोदी,  भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आहे. लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. ही विचारांची लढाई मी लढणार आहे. तीन वेळा महापलिका , पाच वेळा विधानसभा लढलो आहे. गेली पंचेचाळीस वर्ष मी या शहरातील विकासाचे प्रश्न मला हाताळले आहे. मला पुण्याचे प्रश्न महापालिकेत विधानसभेत मांडता आले. . कार्यकर्तेच माझा आत्मा, ते आहेत म्हणून मी आहे. माझा कार्यकर्ता माझी ताकद आहे. युतीतल्या घटकपक्षात कार्यकर्ता हा केंद्रबिंदू आहे.भविष्यकाळात पुणेकरांची सेवा करण्यासाठी मला लोकसभेत पाठवत आहे. तसेच नि: स्वार्थ सेवा, पक्ष निष्ठा , कार्यकर्त्यांचे प्रेम यांनी मला लढण्यासाठी पे्ररणा मिळत असते आणीबाणीच्या काळात तुरुंगात पाऊल टाकताना जो निश्चयी होतो. तेवढाच निश्चयी पालिका, विधानसभेतही होतो. तोच विश्वास, तेच प्रेम, पक्ष निष्ठा, सेवार्थ भावना यांच्यासह त्याच ताकदीने यावेळेस मी लोकसभेत पाऊल ठेवत आहे. राजकीय जीवनात मी कधी कुणाला शत्रू मानत नाही. समाज , मतदार ठरवत असतो. त्याचा निर्णय सर्वसामान्य असतो. बारामतीत कुल ह्या आगामी निवडणुकीत चमत्कार घडवत  एक लाख मतांनी निवडून येतील असा आत्मविश्वास वाटतो.   अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांनी मतदार, कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. संजय काकडे म्हणाले, सर्वच जागांवर युती जिंकणार आहे. तसेच बारामतीत कुल एक लाख मतांनी जिंकून येतील.. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाbaramati-pcबारामतीpune-pcपुणेgirish bapatगिरीष बापटNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस