शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पुण्यात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; जय श्रीराम vs अजितदादांच्या घोषणांनी सभागृह दणाणले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 18:37 IST

या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

पुणे : पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकत्यांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण होते. या आगामी काळातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते एकत्र येत असल्याने राजकीय फटकेबाजी अनुभवायला मिळण्याची शक्यता होती. पण या कार्यक्रमादरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याने कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाला. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यानी पुण्याची ताकद गिरीश बापट, जय श्रीराम च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी आक्रमक रूप धारण करून मग एकच वादा अजितदादा यांसारख्या जोरदार घोषणा दिल्या. यानंतर परिसरात पुरता गोंधळ उडाला व काहीवेळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले. पण पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. 

 ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हा सोहळा महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , महापालिका आयुक्त विक्रम कुमार , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहे. याच वादावरुन हे कार्यकर्ते भिडले असावे अशीं चर्चा आहे.मात्र अदयाप तरी ठोस कारण समोर आलेले नाही.  

पवार- फडणवीस यांच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी पहाटेच्या वेळी अचानक शपथविधी उरकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र ते सरकार अवघ्या ८० तासांसाठी अस्तित्त्वात राहिले. त्यानंतर पुन्हा अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून अर्थ खात्याची महत्वाची जबाबदारी सांभाळत पवार यांचे काम धडाक्यात सुरु आहे. पण आज पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. 

 

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस