जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक

By नितीश गोवंडे | Updated: January 18, 2024 13:02 IST2024-01-18T13:01:39+5:302024-01-18T13:02:54+5:30

पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे....

Birth father himself committed obscenity with minor girls, murderous father arrested | जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक

जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक

पुणे : जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करुन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार लोहियानगर, गंजपेठ येथे बुधवारी (दि. १७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन मुली आहेत. मुली अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आरोपीने मुलींसोबत अश्लील चाळे करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच फिर्यादी मुलीसोबत अश्लील बोलून तिला जवळ ओढून घेतले. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने त्याला विरोध केला असता आरोपीने पीडित मुलीला व तिच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

मुलीने आरोपीला विरोध केला असता नराधम बापाने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिलाही शिवीगाळ केली. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नका अशी धमकी देत, जर माझी पोलिस केस केली तर मी बाहेर आल्यावर तुम्हा सगळ्यांचं जगणं मुश्कील करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत काळे करत आहेत.

Web Title: Birth father himself committed obscenity with minor girls, murderous father arrested