नीरा नरसिंगपूर रस्त्यावर पिकअप दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू; एकजण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 20:50 IST2023-09-07T20:46:31+5:302023-09-07T20:50:02+5:30
पिकअप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू...

नीरा नरसिंगपूर रस्त्यावर पिकअप दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू; एकजण गंभीर
डोर्लेवाडी (पुणे) : बारामती-नीरा नरसिंगपूर रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (दी. ५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुणवडी ढेलेवस्ती (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीत पिकअप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश अंकुश लष्कर (वय २८, रा. कऱ्हावागज, ता. बारामती) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर स्वप्नील बाळू धोतरे (२९, रा. कऱ्हावागज, ता. बारामती) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश व स्वप्नील हे सोनगाव येथे विहिरीच्या कामावर काम करत होते. कामावरून संध्याकाळी घरी कऱ्हावागजकडे जाताना गुणवडी ढेलेवस्ती येथे पिकअप आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.