चिंचवडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 12:44 IST2024-04-20T12:43:25+5:302024-04-20T12:44:02+5:30
संशयित चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला....

चिंचवडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरोधात गुन्हा
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चिंचवड येथील पुर्णानगरमधील सेवा रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
अशोक भाऊसाहेब आवटे (वय ४५), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. राहुल अशोक आवटे (२१, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांचे वडील अशोक आवटे हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पुर्णानगर येथील सेवारस्त्यावर संशयित चालकाच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने अशोक यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन अशोक यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संशयित वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक तपास करीत आहेत.