शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 21:54 IST

NCP Ajit Pawar Group Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

NCP Ajit Pawar Group Pune News: आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. या वर्षातच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच ठाकरे गटाला मोठे खिंडार पडत असून, शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश करत आहेत. यातच पुण्यातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. महादेव बाबरराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

राज्यात ऑक्टोंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक येऊ शकते, असे म्हटले जात आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये होणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता निवडणूक आयोग तयारी करत आहे.

अजित पवारांच्या उपस्थितीत महादेव बाबरराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर उद्या करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बाबर यांनी जय महाराष्ट्र केला होता. 

दरम्यान, पुण्याच्या हडपसर विधानसभेत महाविकास आघाडी कडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून महादेव बाबर इच्छुक होते. हडपसरची जागा शरद पवार गटाकडे गेल्याने महादेव बाबर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMahadev Babarमहादेव बाबर