शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन आरक्षणाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे खिडकीवरील तिकीटाला घरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:46 IST

केंद्रांवर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते बंद केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

ठळक मुद्देशहरात पुणे रेल्वे स्टेशनसह डेक्कन, शंकरशेठ रस्ता, कॅम्प आणि रविवार पेठेत आरक्षण केंद्र

पुणे : ऑनलाईन आरक्षित तिकीटाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील आरक्षण केंद्रांकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे शहरातील एकुण चार केंद्रांपैकी दोन केंद्र बंद करण्यात आली आहेत. तसेच रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्याही कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू झाला आहे.शहरात पुणे रेल्वे स्टेशनसह डेक्कन, शंकरशेठ रस्ता, कॅम्प आणि रविवार पेठेत आरक्षण केंद्र होती. त्यापैकी रविवार पेठेतील केंद्र इमारती जुनी झाल्याच्या कारणास्तव काही दिवसांपुर्वीच बंद करण्यात आले आहे. तर शुक्रवारी (दि. ६) कॅम्पमधील केंद्र मंगळवार (दि. १०) पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रांवर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने केंद्र बंद केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांकडून सध्या ई-तिकीटींगलाच जास्त प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याकडे वळावे, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.देशभरात रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी ई-तिकीटींगचाच वापर अधिक प्रमाणात केले जात असल्याचे चित्र आहे. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक आरक्षण आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून होत आहेत. तर तिकीट आरक्षण केंद्रांवर हे प्रमाण केवळ ३० टक्क्यांहून कमी आहे. दिवसागणित त्यात घट होत चालली आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक, ऑनलाईन आरक्षणाची माहिती नसलेले, अशिक्षित प्रवासीच तिकीट खिडकीवर जाऊन आरक्षण करत आहेत. हे प्रमाण घटत चालल्याने देशभरातील आरक्षण केंद्र बंद पडू लागली आहे. त्यात आता पुण्याचाही समावेश झाला आहे. चारपैकी दोन केंद्र बंद करण्यात आली असून शंकरशेठ रस्ता व डेक्कन येथील केंद्रही प्रतिसाद आणखी कमी झाल्यास बंद केले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. --------------पुणे रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडक्यांची संख्या १० हून अधिक आहे. त्यामुळे तिथे नेहमीच जास्त गर्दी असते. पण भविष्यात या खिडक्यांची संख्याही कमी केली जाऊ शकते. याबाबत रेल्वेकडून विचार सुरू करण्यात आला आहे. ई-तिकीटींगलाच अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.-----------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेreservationआरक्षणticketतिकिटonlineऑनलाइन