शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्‍यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर; सिकंदराबादहून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:22 IST

भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्‍यानेच फोडला सैन्य भरती पेपर सिकंदराबादहून खंडणी विरोधी पथकाने केली अटक, दिल्लीहून साथीदार अटकेत

पुणे : भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार्‍या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्‍यानेच सैन्य भरती पेपर फोडला असून या रॅकेटचा तोच मुख्य सुत्रधार असल्याचे पुणेपोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या मुख्य सुत्रधार अधिकार्‍यास सिकंदराबाद व त्याच्या साथीदारास दिल्ली येथून पुणे पोलिसांनीअटक केली आहे. भगतप्रितसिंग बेदी (रा. सिकंदराबाद) असे भरती प्रक्रिया प्रमुख लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्याचा साथीदार नारनेपाटी वीरप्रसाद (रा. दिल्ली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. सैन्य दलातील कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांसाठी आर्मी शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा २८ फेब्रुवारी रोजी भारतभरातील ४० केंद्रांवर होणार होती. या परिक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडून  काही व्यक्ती ती प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती सर्दन कंमाड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही गोपनीय माहिती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी परिसरात सापळा रचून कारवाई करून किशोर गिरी (रा. माळेगाव), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना हा पेपर तामिळनाडु येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली. हा पेपर त्याला दिल्लीतील अधिकारी वसंत किलारी याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. 

त्यानंतर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यानेच पेपर लिक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, हवालदार अतुल साठे व राजपूत यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बेदी याला दिल्लीहून ताब्यात घेऊन अटक केली. नारनेपाटील वीरप्रसाद याला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार वांजळे, पोलीस नाईक केकाण यांनी अटक केली आहे. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे,  सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अतुल साठे, प्रवीण राजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, गजानन सोनवलकर, प्रफल्ल चव्हाण,  पिराजी बेले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकIndian Armyभारतीय जवानexamपरीक्षा