मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर, घरात पाय घसरून पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 14:54 IST2024-03-28T14:53:15+5:302024-03-28T14:54:16+5:30
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांना दाखल केले आहे.

मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर, घरात पाय घसरून पडले
पुणे-मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरुन पडले आहेत.
दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया होणार आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांना केले दाखल केले आहे.
बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले
रात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना पाय घसरुन वळसे पाटील पडल्याची माहिती मिळत आहे. यात त्यांच्या हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली.त्यांच्यावर पुण्यातील औंध येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १२ ते १५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील असं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील दुखापत झाले आहेत. त्यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे. शिवाजी आढळराव पाटलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटलांवर आहे.
काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) March 28, 2024