शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 20:40 IST

९ एप्रिलपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटाची शक्यता

पुणे : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या शुक्रवारपासून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

विदर्भाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. कोकण, गोव्याच्या बर्‍याच भागात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. 

विदर्भात उष्णतेच्या लाटेनंतर ९ एप्रिलपासून पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ ते ११ एप्रिल दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. 

नांदेड जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल तसेच हिंगोली, परभणी जिल्ह्यात १० व ११ एप्रिल आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी आणि अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ११ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे व परिसरात ९ ते ११ एप्रिल दरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भRainपाऊसweatherहवामान