शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 14:58 IST

कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

श्रीकिशन काळे

पुणे : आगामी अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत.

सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने शनिवारी पुण्यात बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये राज्यातून आलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. या नावांमध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे आणि  जेष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचा समावेश होता. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद करून साहित्य महामंडळ आता संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करते. त्यानूसार यंदा शोभणे यांची निवड केली आहे. दरम्यान साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आज पुण्यात साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन डॉ. शोभणे यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, 'उत्तरायण'साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार,  'उत्तरायण'साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार,  सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळSocialसामाजिकcultureसांस्कृतिकEducationशिक्षण