शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बडा माणूस बडा दिल! जेव्हा आपल्या 'पुणेकर' मित्राला भेटायला दस्तूर खुद्द रतन टाटा अवतरतात...

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 6, 2021 20:45 IST

माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याचे पाय जमिनीशी जोडलेले असलेले पाहिजे या वाक्याला सार्थ ठरवणारी घटना पुण्यात अनुभवायला मिळाली... 

पुणे : रतन टाटा नाम तो सुना ही होगा! हो तेच टाटा ज्यांनी भारतीय उदयॊग क्षेत्रात आणि समाजकार्यात भरीव योगदान दिले आहे.तसेच कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपत केलेली कोट्यवधींची आर्थिक मदत असेल वा कोविड रुग्णालय उभारणीचे काम यातही ते कायम अग्रेसर राहिले आहे. असे हे महान व्यक्तिमत्व त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या छोट्या मनात मोठे घर करून गेले. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याचे पाय जमिनीशी जोडलेले असलेले पाहिजे या वाक्याला सार्थ ठरवणारी घटना पुण्यात अनुभवायला मिळाली.

कोथरूडमधील गांधीभवनाशेजारील वूडलँड सोसायटी हे स्थळ...वेळ दुपारी तीनची..कोणताही बडेजाव किंवा लवाजमा सोबत न आणता ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे आजारी माजी कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईहून थेट पुण्याला गेले. टाटा भेटायला गेलेला मित्र दोन वर्षांपूर्वी टाटा समूहासाठी काम करत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. मुंबईहून पुण्याला आलेल्या रतन टाटा यांनी या आजारी कर्मचाऱ्याची आवर्जुन भेट घेतली. या भेटीत टाटांनी कर्मचाऱ्याच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच टाटा यांनी आजारी कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे.  दोघांच्या भेटीचा फोटो सोसायटीत राहणाऱ्या एकाने ट्विटरवर टाकला आहे.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वूडलँड सोसायटीत राहणारे इनामदार म्हणून गृहस्थ टाटांच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. रविवारच्या भेटीत टाटांच्या इनामदार यांच्याशी जवळपास पाऊण तासभर गप्पा रंगल्या. तसेच आपल्या कर्मचारी मित्राला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत टाटा अगदी सहजपणे माघारी परतले. मात्र ज्येष्ठ उद्योगपती टाटा वूडलँड सोसायटीत आले आहे ही चर्चा तोपर्यंत वाऱ्यासारखी पसरली अन् सोसायटीत तोबा गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पण टाटा माघारी परतल्याची माहिती मिळाल्यावर अनेकांची घोर निराशा झाली.

सोसायटीतील एका महिलेने सांगितले की, रतन टाटा हे आपल्या मित्राला भेटायला वूडलँड सोसायटीत आले होते. पण ही भेट अगदी अल्पावधी आणि आमच्यासाठी तितकीच अनपेक्षित अशीच होती. मात्र या सदिच्छा भेटीदरम्यान कुठलाही बडेपणाचा आम्हाला पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच ते आल्याची कल्पना देखील कोणाला आली नव्हती.

 

सोसायटीचे अध्यक्ष अभिजित मकाशीर म्हणाले , माझे काम आटोपून मी रविवारी दुपारी सोसायटीत परतलो होतो. तितक्यात टाटा मोटर्सच्या दोन नव्या गाड्या समोर दिसल्या.आणि अचानक रतन टाटा गाडीतून उतरले व तेवढ्याच वेगाने ते झट की पट लिफ्टमध्ये देखील शिरले.दोन मिनिटं विश्वासच बसेना आहे सत्य आहे की भास.. पण ते रतन टाटाच होते. त्यांची विनम्रता व साधेपणा वाखाणण्याजोगा होता. परत जाण्यासाठी ते जेव्हा पार्किंगमध्ये आले तेव्हा मी आणि मुलगी आदिश्री त्यांना भेटलो. अवघ्या काही क्षणांच्या भेटीत रतन टाटांनी आम्हाला स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, त्यापासून कधीही विचलित होऊ नका असा कानमंत्रही दिला असल्याचे मकाशीर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडRatan Tataरतन टाटा