शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आखाती देशांत चाकणचा कांदा , दुबई, कुवेत, मस्कतमधून मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:26 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात सन २०१७-१८ सालामध्ये २८ फेब्रुवारीअखेर ११ लाख १९ हजार ५८२ कांदा पिशव्यांची म्हणजेच ५ लाख ६० हजार २२२ क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीतकमी ७०० व जास्तीत जास्त ४००० आणि सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

चाकण - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात सन २०१७-१८ सालामध्ये २८ फेब्रुवारीअखेर ११ लाख १९ हजार ५८२ कांदा पिशव्यांची म्हणजेच ५ लाख ६० हजार २२२ क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीतकमी ७०० व जास्तीत जास्त ४००० आणि सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षात कांदा बाजारात एकूण १ अब्ज ७ कोटी ६१ लाख ३४ हजार ३५० रुपये उलाढाल झाली असून बाजार समितीला मार्केट फी च्या माध्यमातून १ कोटी ७ लाख ६१ हजार ३४२ उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये आज ( दि. १० ) ४० हजार कांदा पिशव्यांची आवक होऊन कांद्याला ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. मागील आठवड्यापासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यामुळे आवक मध्येही मोठी घट झाली आहे. चाकण परिसरातील शेतक-यांच्या कांद्याला आखाती देशातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून चाकणचा कांदा दुबई, कोलंबो, दमाम, कुवेत, मस्कत या देशांमध्ये निर्यात होत आहे.मार्केट यार्ड मध्ये गुलाब सोपाना गोरे पाटील यांच्या प्रशांत ट्रेडिंग कंपनी व जमीरभाई सुन्नुभाई काझी यांच्या जे के एक्सपोर्टर मार्फत दोन्ही अडत्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांसाठी कांद्याचे निर्यात करून शेतक-यांना परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सध्या निर्यात व आडते आखाती देशांमध्ये विशेषत: दुबई, कोलंबो, दमाम, कुवेत, मस्कत या ठिकाणी कांदा निर्यात करीत आहेत. त्यामुळे भविष्यात कांदा उत्पादक शेतक-यांना योग्य व रास्तभाव मिळणार आहे.लतिफभाई बद्रुद्दीन काझी यांच्या गाळ्यावर चिंचोशी येथील शेतकरी पोपट केशव मोरे या शेतक-याने आणलेल्या ५६ कांदा पिशव्यांना १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. हा माल दिल्ली येथील तलरेजा ट्रेडिंग कंपनी या व्यापा-याने खरेदी केला आहे. तसेच कोरेगाव बुद्रुक येथील शेतकरी परसराम डावरे या शेतक-यांच्या ९९ कांदा पिशव्या प्रशांत ट्रेडिंग कंपनीने १००० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केला आहे.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात चाकण मार्केट यार्ड मध्ये १३ लाख ३५ हजार ५९३ कांदा पिशव्या म्हणजेच ६ लाख ६८ हजार २३८ क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त १०५० आणि सरासरी ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सन २०१६-१७ या वर्षात कांदा मार्केट मध्ये एकूण ६४ कोटी ३० लाख ९६ हजार ६२९ रुपये उलाढाल झाली असून बाजार समितीला मार्केट फी च्या माध्यमातून ६४ लाख ३० हजार ९३६ रुपये उत्पन्न मिळाले आहे.कांदा बाजारात १ अब्ज रुपयांची उलाढालचालू वर्षात चाकण बाजारात ११ लाख १९ हजार ५८२ कांदा पिशव्यांची आवककांदा बाजारात एकूण १ अब्ज ७ कोटी ६१ लाख ३४ हजार ३५० रुपये उलाढालबाजार समितीला मार्केट फीच्या माध्यमातून १ कोटी ७ लाख ६१ हजार ३४२ उत्पन्न

टॅग्स :onionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्र