शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार 'राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 21:27 IST

देशात कोलकत्ता आणि अहमदाबादनंतर आता महाराष्ट्रात ही नगरी साकारणार

पिंपरी : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती विकसित होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीमध्ये भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी साकारणार आहे. देशात कोलकत्ता आणि अहमदाबादनंतर आता महाराष्ट्रात ही नगरी साकारणार आहे. त्यासाठी दोनशे कोटींचे अनुदान मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाच्या मदतीने चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टरजवळ २०१३ मध्ये पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क निर्माण करण्यात आला. हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असल्याने  राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय यांच्या सहाय्याने सायन्स सिटी उभारण्यचा विषय पुढे आला होता. त्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे....................असा आहे उद्देश१) विविध वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव निर्माण व्हावा.२) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे हा संकल्प.३)  एकविसाव्या शतकातील कौशल्ये, जागतिक नागरिकत्व, उद्योग व उद्योजकता, बहु अनुशासनात्मक, अनुभवात्मक शिक्षण मिळवून देणे..........................दृष्टीक्षेपात...आवश्यक आठ एकर क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी एक एकर जागेत विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र आहे. उर्वरीत सात एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत १९१ कोटी रुपये खर्चाचे विज्ञान अविष्कार केंद्र असणार आहे..................................... एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून देशाला समृद्ध बनविण्याचे स्वप्न व दूरदृष्टी देऊन परिवर्तन करण्यासाठी विज्ञान विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प होणार आहे. त्यातून शहराची नवी ओळख होणार आहे. पिंपरी-चिंचवड सायन्सपार्कला मोठ्याप्रमाणावर नागरिक भेट देत असतात. सायन्स पार्क ही शहराची नवी ओळख बनली आहे. विज्ञान अविष्कार केंद्राने शहराचा लौकिक वाढणार आहे.  - राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका. ...............विज्ञान केंद्रामुळे पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या केंद्राला वर्षाला सरासरी अडीच लाख विद्यार्थी भेट देतात. केंद्र सरकारच्या वतीने कोलकत्ता, अहमदाबाद येथे आता विज्ञान प्रकल्प आहे. अविष्कार नगरी उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे.  - प्रवीण तुपे संचालक; पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडscienceविज्ञानCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार