पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:16 PM2021-06-17T14:16:57+5:302021-06-17T14:22:36+5:30

असे जिल्ह्यात एकूण २६ पालक, बालकांच्या संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवणार

Big decision of Pune district administration! The right of the child to the property of the parents who lost their lives due to corona | पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क

पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे सर्व बालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश

पुणे: कोरोनामुळे जिल्ह्यातील २६ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांचा संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अशा बालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत. अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्य रीतीने होतो किंवा नाही. याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. 

चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय पथक नियुक्त करण्यात यावीत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे. बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Big decision of Pune district administration! The right of the child to the property of the parents who lost their lives due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app