शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पुणेकरांसाठी मोठा 'दिलासा'दायक बातमी : शहरातील रुग्ण दुपटीचे प्रमाण १२० दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 11:17 AM

पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव येतोय आटोक्यात..!

ठळक मुद्देमागील पंधरा दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पाचशेच्या आत

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत चालली असून शहरामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही घटले आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचे होण्याचे प्रमाण आठ दिवसांवरून १२० दिवसांवर गेले आहे. त्यामुळे प्रशासनालाही दिलासा मिळाला असून शहरातील कोरोना आटोक्यात येत असल्याचे हे सकारात्मक चिन्ह दिसत आहे.

शहरात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी पुण्याचा आढळून आला. त्यानंतर दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच गेली. जशी रुग्णांची संख्या वाढली तसे कोविड केअर सेंटर वाढविण्यात आले. विलगीकरण कक्ष वाढविण्यात आले. यासोबतच खासगी रुग्णालयांसोबत महापालिकेने करार करून अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली. अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आयसीयू आणि वेंटिलेटर वाढविण्यात आले. 

दोन महिन्यांपूर्वीच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. तसेच बाणेर येथे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात आले. त्यामुळेही रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. पुणे महापालिका प्रशासन अहोरात्र या साथीच्या आजारांची मुकाबला करण्यात आघाडीवर होते. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ झाली. दिवसाकाठी दोन हजार रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले. या काळात रुग्णांच्या दुप्पट होण्याचा वेग हा आठ दिवसांवर आला होता आणि ही चिंतेची बाब होती. परंतु शासकीय यंत्रणांनी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण संख्या कमी होत गेली. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या घटत गेली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या पाचशेच्या आतच पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे शहरातील १० हजारपेक्षा अधिक खाटा रिकाम्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही घटले आहे. आता रुग्ण दुप्पट होण्याचा दर १२० दिवसांवर गेला आहे. ही सकारात्मक बाब असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं आणि योग्य काळजी घेतल्यास आणखी लांबणीवर जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.-------रुग्ण दुप्पट होण्याचा दर (डबलिंग रेट) १२० दिवसांवर गेला आहे. मधल्या काळात हे प्रमाण सात-आठ दिवसांवर आले होते. गणेशोत्सवानंतर आलेली लाट कमी झाली असून दिवाळी नंतर दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेतल्यास दुसरी लाट थोपविणे शक्य होईल.- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवार