शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Bhushi Dam Lonavala: भुशी धरण ओव्हर फ्लो! १५ दिवस अगोदरच ओसंडून वाहू लागले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:05 IST

Bhushi Dam Lonavala मागील वर्षी ३० जुन रोजी भुशी धरण भरले होते या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले

लोणावळा : पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण हे १६ जून रोजी पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. मागील महिनाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला होता. लोणावळ्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळ पर्यंत १४३सेंमी(५. ६३ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Bhushi Dam Lonavala) 

आज सकाळपासूनच सहारा पुल धबधबा व भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. सकाळच्या वेळेत  धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा आनंद अाज (सोमवारी) पर्यटकांना घेता आला. मागील आठवड्यांपासून पर्यटक भुशी धरण भरण्याची वाट पाहत होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक धरणावर गर्दी करत होते. मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने आज अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतिक्षा संपवली. मागील वर्षी ३० जुन रोजी भुशी धरण भरले होते या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे. 

संततधार कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरातील धबधबे मोठ्याप्रमाणात वाहू लागल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरणही ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. धरण‍ाच्या सांडव्यावरुन पायर्‍यांवर पाणी वाहू लागले आहे. पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल, तर भुशी धरणाचा चांगला पर्याय आता उपलब्ध झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मागील दोन वीकेंडलाही लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. शनिवारी आणि रविवारी जोरात पाऊस असल्याने अनेकांना वाटत होते की भूशी धरण अोव्हरफ्लो होईल मात्र भुशी धरण भरलेलं नसल्यामुळे पर्यटकांना हवा तसा आनंद घेता आला नाही. पण आता भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.आज (सोमवारी) धरणाच्या पायर्‍यांवरून पाणी अोसांडून वाहताच पर्यटकांनी यथेच्छ भिजण्याचा आनंद घेतला असून येथील लहान मोठ्या व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळlonavalaलोणावळाDamधरणRainपाऊसNatureनिसर्गenvironmentपर्यावरण