Crime: भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 15:57 IST2021-11-25T15:33:43+5:302021-11-25T15:57:01+5:30
फिर्यादी सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता एमआयडीसी भोसरी येथील क क्षेत्रीय कार्यालयासमोरून पायी चालत जात होते...

Crime: भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून लुटले
पिंपरी: पायी जाणाऱ्याला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर मोबाईल आणि रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता क क्षेत्रीय कार्यालयासमोर एमआयडीसी भोसरी येथे घडली. रोहन राणुजी शिंदे (वय २२), विजय राजू तांगडे (वय १८, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रदीपकुमार सुरेशप्रसाद सिंग (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता एमआयडीसी भोसरी येथील क क्षेत्रीय कार्यालयासमोरून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले.