शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत - डॉ. सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 2:33 AM

‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली.

पुणे : ‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. चुकीच्या निर्णयामुळे इतिहासाला कशी चुकीची दिशा मिळू शकते, याचे महाभारत आणि भीष्म उत्तम प्रतीक आहे. भीष्म हे महाभारताचे सक्रिय साक्षीदार होते. त्यांनी घेतलेल्या अतार्किक भूमिकेमुळे महाभारत घडले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे लेखक रवींद्र शोभणे यांच्या महाभारत कथांवर आधारित ‘उत्तरायण’ या कादंबरीचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लेखक भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र शोभणे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.भारत सासणे आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘उत्तरायण’ या कादंबरीवर भाष्य केले. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. सायली लाखे-पिदळी यांनी सूत्रसंचालन केले.साहित्यकृती अस्मितेचा विषयकोत्तापल्ले म्हणाले, ‘‘आपण महाभारत किंवा रामायणासारख्या कलाकृतींकडे इतिहास म्हणून पाहतो. त्यामुळे लगेच हे साहित्य एका समाजाचे प्रतिनिधित्व करायला लागते आणि त्यामुळे ती साहित्यकृती त्यांच्या अस्मितेचा विषय होऊन जातो. परंतु, जागतिक पातळीवर या कलाकृतीला महाकाव्य या दृष्टिकोनातून पाहिले जात असेल, तर भारतीयांनी त्याही दृष्टिकोनाचा आदर केला पाहिजे. या महाकाव्यांवर आधारित पौराणिक नाटके पारंपरिक दृष्टिकोनावर आधारित होती. या महाकव्यांचा विश्लेषणात्मक मूल्यांतून अभ्यास होणे अपेक्षित होते. लोकचळवळी बळावल्या तसा महाभारतातील कर्ण या पात्रास केवळ महाभारतातील पात्र म्हणून महत्त्व न राहता तो समाजातील उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनही पुढे येऊ लागला.’’

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेcultureसांस्कृतिक