भिगवण (पुणे जि.) - भिगवण येथे घडलेल्या तरुणी पळवून नेल्याच्या कथित घटनेला नवे वळण मिळाले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र संबंधित तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली असून, तिने शपथपत्र देत अपहरणाचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने तरुणासोबत गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील ‘अपहरण’चा आरोप संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही घटना इंदापूर तालुका परिसरात घडल्याने स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे.
Web Summary : Bhiganvan kidnapping case twists as the girl claims she left willingly, refuting abduction. The brother insists she was forced and demands her return. Police investigate conflicting claims.
Web Summary : भिगवण अपहरण मामले में नया मोड़ आया है क्योंकि लड़की ने अपहरण से इनकार करते हुए दावा किया कि वह स्वेच्छा से गई थी। भाई का कहना है कि उसे मजबूर किया गया और उसकी वापसी की मांग की। पुलिस विरोधाभासी दावों की जांच कर रही है।