Bhide Bridge Pune: पुढील दीड महिने भिडे पूल वाहतुकीसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:05 IST2025-11-05T14:04:48+5:302025-11-05T14:05:33+5:30
पुन्हा १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे

Bhide Bridge Pune: पुढील दीड महिने भिडे पूल वाहतुकीसाठी खुला
पुणे : डेक्कन मेट्रो स्टेशनला पादचारी पूल जोडण्यासाठी भिडे पुलावर मेट्रोकडून पूल उभारण्यात येत आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक गेले काही महिने बंद करण्यात आली होती. आता दि. १४ नोव्हेंबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी दिवसरात्र खुला राहणार आहे. तर १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
डेक्कन मेट्रो स्टेशनला प्रवाशांना ये-जा करण्याचे सोयीचे होण्यासाठी भिडे पुलावरून पादचारी पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता पुन्हा पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परंतु वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत पुलाचे काम रात्री करावे, असे सांगण्यात आले. त्यामुळे पुढील दीड महिने हा पूल रात्री वाहतुकीसाठी असणार असून, दिवसा मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मध्यवर्ती भागात जाण्यासाठी सोयीचे होणार आहे.