शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:20 IST

ही दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते.

ठळक मुद्देऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे १२९ वर्षापासून विराजमान

पुणे : भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश करुन मंदिरातील दान पेटी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी मंडळाचे सचिव दिलीप धोंडीराम आडकर (वय ५२, रा़ धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना २६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून ३१ ते २ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान गणपती मंदिरात घडला आहे़.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठ येथील गणपती भवन व गणपती मंदिरात सीसीटिव्ही  बसविलेले आहेत. गणपती मंदिरात भाऊसाहेब रंगारी यांनी स्वत: तयार केलेला लाकडी रथ व गणपतीची मुर्ती त्या ऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे १२९ वर्षापासून विराजमान असते व तीच मुर्ती गणेशोत्सवात दहा दिवसाकरिता प्रतिष्ठापना करून बसवली  जाते़    गणपती मंदिरात स्टीलची असलेली दोन फुटाच्या आकाराची दानपेटी अनेक वर्षापासून ठेवलेली आहे. ही दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पहाटे २ वाजून ३१ वाजता दोन चोरट्यांनी दुचाकी वाहनावरुन येऊन मंदिराचा दरवाजा तोडून चोरून नेल्याचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे़. दोघांनी ही दान पेटी दुचाकीवरून पळवून नेली़ दान पेटीत किमान एक ते दीड हजार रुपये असण्याची शक्यता आहे़. भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर हे विश्रामबाग व फरासखाना पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूला दोन मिनिटांच्या अंतरावर आहे़. राज्यात हाय अलर्ट असताना पोलीस ठाण्यांच्या समोरील बाजूला असलेल्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे़. या पूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तुच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, असे ट्रस्टचे कायदा सल्लागार अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी सांगितले़.़़़़़़़़़शहरातील विविध मंदिरे तसेच सर्व सार्वजनिक गणेश मंडळे आणि नवरात्र महोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी मंदिरे उभारली आहे़. अशा मंदिरासमोरील दान पेट्या फोडून त्यातील पैसे चोरण्याचे प्रकार वारंवार होत असतात़. \\\\\\\\

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरPoliceपोलिस