भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई : भेसळ युक्त तुपाचे १०० डब्बे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 14:33 IST2020-12-17T14:33:14+5:302020-12-17T14:33:34+5:30
साडेचार लाखाचे गायीचे भेसळ युक्त तूप

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई : भेसळ युक्त तुपाचे १०० डब्बे ताब्यात
कात्रज: आंबेगाव भागातील अभिनव कॉलेज समोरून सुमारे १०० डब्बे तूप घेऊन जाणारा टेम्पो पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना संशय आल्याने चेक केला.यावेळी चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
याविषयी माहिती देताना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी सांगितले की,१२ डिसेंबर ला आंबेगाव परिसरातील अभिनव कॉलेज जवळ मी व माझे सहकारी पेट्रोलीग करीत होतो.यावेळी आमचे कर्मचारी राहुल तांबे व सचिन पवार यांना या भागातून भेसळ युक्त तूप जात असल्याची माहिती मिळाली.काही गाड्याची चेकीग केल्यानंतर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच १२ आर एन २४५० टेम्पो आम्ही थांबवला यामध्ये कुटलाही मार्क,कपनीचे नाव नसलेले सुमारे १०० डब्बे तूप आढळले.
गाडी चालक शिवराज हळमणी (रा.हत्तीकनबस,ता.अक्कलकोट,जी.सोलापूर) याने हा माल डीजीएम (देवक फुड्स कंपनी ) शिवणे येथील कंपनीतून घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने अन्न औषध प्रशासनाला याची माहिती कळवली.या विभागातील क्रांती बारवकर यांनी पाहणी करून हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याची खात्री केली.या कारवाई मध्ये सुमारे १४९९ किलो गायीचे तूप किमत अंदाजे साडेचार लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर,पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे,पोलीस कर्मचारी संतोष भापकर,सोमनाथ सुतार,रविंद्र भोसले,सर्फराज देशमुख,सचिन पवार,अभिजित जाधव,गणेश शेंडे,राहुल तांबे,विक्रम सावंत यांनी केली