शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषासंवर्धनासाठी मिळणार भरघोस निधी

By admin | Updated: March 18, 2015 00:44 IST

मराठी भाषा दिनीच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मराठी भाषासंवर्धन समितीसाठी करण्यात आलेली तरतूद ६२ लाखांवरून २८ लाखांवर आणण्याचा घाट घालण्यात आला होता.

पुणे : मराठी भाषा दिनीच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मराठी भाषासंवर्धन समितीसाठी करण्यात आलेली तरतूद ६२ लाखांवरून २८ लाखांवर आणण्याचा घाट घालण्यात आला होता. हा निधी नजरचुकीने कमी झाला असून, तो पूर्ववत करण्याचे आश्वासन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी मंगळवारी अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान दिले. निधी कपात केल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘महापालिकेचाच खोडा : मराठी भाषासंवर्धनात पाऊल टालके मागे’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली होती. त्याचा दाखला देत मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगून ही तरतूद पूर्ववत करण्याची मागणी केली होती. मराठी भाषेच्या संवर्धन करण्याचा विडा उचलत महापालिकेच्या स्थायी समितीने २०१३-१४ मध्ये अंदाजपत्रकात कामगार विभागाच्या अंतर्गत भाषासंवर्धनासाठी तरतूद केली. त्याच वर्षी भाषासंवर्धन समितीचाही स्थापना करून त्यात ज्येष्ठ साहित्यिकांचा समावेश करण्यात आला. या समितीला विश्रामबाग येथील झाशीची राणी शाळेत कार्यालय मिळाले खरे; पण त्यासाठी कामगार विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्गच नसल्याने आठवड्यातून एकदा या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात येते, अशी सध्याची परिस्थिती आहे. २०१४-१५मध्ये पालिकेच्या अंदाजपत्रकात भाषासंवर्धनासाठी तब्बल ६२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी (२०१५-१६) त्या तरतुदीमध्ये कमालीची कपात करून हा निधी २८ लाखांवर आणण्यात आला. याबाबत वागसकर यांनी मुख्य सभेत नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे मराठी भाषा दिनी हा प्रकार करणे योग्य नसल्याचे सांगत या प्रकराचा निषेध केला. तसेच, ही तरतूद पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यानंतर आपल्या भाषणात कर्णेगुरुजी यांनी हा प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली दिली. ही चूक दुरुस्त करून या समितीसाठी पूर्वीप्रमाणेच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)