पंचायत समितीवर ताबा मिळवण्यासाठी भरणे प्रयत्नशील, पाटलांची कसोटी, माने गणिते बिघडवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:39 IST2025-07-20T16:38:49+5:302025-07-20T16:39:05+5:30
मिनी मंत्रालयात जाण्यासाठी इंदापूरमधून नेत्यांची धावपळ वाढली; गट व गणांची संख्या गट-आठ, गण-सोळा झाली

पंचायत समितीवर ताबा मिळवण्यासाठी भरणे प्रयत्नशील, पाटलांची कसोटी, माने गणिते बिघडवणार
सतीश सांगळे
कळस : जिल्ह्यात गट व गणांची नवी रचना करण्यात आल्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी मिनी आमदारांची कसोटीच लागली आहे. इंदापूर तालुक्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गण होते. आता या संख्येत वाढ करून आठ गट आणि सोळा गण तयार करण्यात आले आहेत. तालुक्यात नेहमीच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी संघर्ष चालू असतो. विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याभोवती सत्तेसाठी ही निवडणूक फिरत असते. मात्र, यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या भाजपा प्रवेशामुळे तालुक्यात तिरंगी लढत अनिवार्य झाली आहे.
पंचायत समितीवर गेल्या २५ वर्षांपासून हर्षवर्धन पाटील समर्थकांचे निर्विवाद वर्चस्व आहे. भरणे यांना आमदार व मंत्री असूनही पंचायत समितीवर ताबा मिळवता आला नाही. मात्र यावेळी भरणे यांनी पूर्ण ताकदीने तयारी करून यायला सुरुवात केली आहे. तसेच माने यांचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे त्यांच्या ताकदीतही वाढ झाली असून, काही गट व गणांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याने सत्तेची गणिते बिघडू शकतात.
तालुक्यात पवारांच्या दोन्ही पक्षांत भेदभाव कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील निवडणुकांचे निकाल नेहमीच संमिश्र येतात. विद्यमान आमदार व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फायदा होण्याची शक्यता असून, मात्र राष्ट्रवादी पक्षाला एकसंध बांधून ठेवणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भरणे प्रयत्नशील आहेत. मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील व निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर कायम ताबा ठेवला आहे. जिल्हा परिषदेत संख्या वाढवण्यासाठी व पंचायत समितीवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
चालू पक्षीय बलाबल-
वालचंदनगर, कळस, पळसदेव, बिजवडी, वडापुरी, काटी, भिगवण, शेटफळगढे हे चार गट भरणे यांच्या वर्चस्वाखाली आहेत. तर सणसर, लासुर्णे, निमगाव केतकी, निमसाखर, बावडा, लाखेवाडी हे हर्षवर्धन पाटील समर्थक आहेत. पंचायत समितीत पाटील समर्थक सत्ता असून ८ सदस्य आहेत तर भरणे समर्थक ६ सदस्य आहेत.
जिल्हा परिषदेचे आठ गट - भिगवण, पळसदेव, वडापुरी, निमगाव केतकी, वालचंदनगर, लासुर्णे, काटी, बावडा.
पंचायत समितीचे सोळा गण -
भिगवण, शेटफळगढे, पळसदेव, बिजवडी, माळवाडी, वडापुरी, निमगाव केतकी, शेळगाव, बोरी, वालचंदनगर, लासुर्णे, सणसर, काटी, लाखेवाडी, बावडा, लुमेवाडी.
गट व गणनिहाय समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे:
१. भिगवण-शेटफळगढे गट:
- भिगवण गण: भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी, बंडगरवाडी, कुंभारगाव, मदनवाडी.
- शेटफळगढे गण: शेटफळगढे, पिंपळे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, शिंदेवाडी, निंबोडी, अकोले, वायसेवाडी, काझड.
२. पळसदेव-बिजवडी गट:
- पळसदेव गण : डाळज नं.१, डाळज नं.२, डाळज नं.३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी.
- बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाड वरखुटे बु., करेवाडी, लोणी देवकर, बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २, कालठण १.
३. माळवाडी-वडापुरी गट :
- माळवाडी गण : माळवाडी, कालठण २, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती सुगाव, शहा, सरडेवाडी, गोखळी, तरंगवाडी.
- वडापुरी गण : वडापुरी, कांदलगाव, तरटगांव, हिंगणगाव, बाभूळगाव, भाटनिमगांव, वडापुरी, गलांडवाडी २, अवसरी, बेडशिंग, भांडगाव.
४. निमगांव केतकी – शेळगाव गट :
- निमगाव केतकी गण : निमगाव केतकी, व्याहाळ कचरवाडी (नि.के), गोतोंडी, हगारवाडी.
- शेळगाव गण : शेळगाव, कडबनवाडी, रुई, थोरातवाडी, मराडवाडी, शिरसाटवाडी, निमसाखर.
५. बोरी – वालचंदनगर गट:
- बोरी गण : बोरी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी-बिरंगूडवाडी, जंक्शन, आनंदनगर, भरणेवाडी.
- वालचंदनगर गण : वालचंदनगर, अंथुर्णे, रणमोड कळंब.
६. लासुर्णे-सणसर गट:
- लासुर्णे गण : बेलवाडी, लासुर्णे, थोरातवाडी, जांब बंबाडवाडी, कुरवली, चिखली, कर्दनवाडी, परीटक चव्हाणवाडी.
- सणसर गण : सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, सपकळवाडी, तावशी, पवारवाडी, मानकरवाडी, ज हिंगणेवाडी, घोलपवाडी.
७. काटी – लाखेवाडी गट :
- काटी गण : काटी, रेडा, वरखुटे खुर्द, सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी.
- लाखेवाडी गण : लाखेवाडी, पंधरवाडी, रेडणी, शेट हवेली, भोंडणी, झगडेवाडी, जाधववाडी, खोरोची.
८. बावडा – लुमेवाडी गट :
- बावडा गण : बावडा, सुरवड, वकीलवस्ती, बोराट चाकाटी, पिठेवाडी.
- लुमेवाडी गण : निरनिमगाव, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बु., गिरवी, नरसिंहपूर.