शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड'ही अडचणीत

By admin | Updated: July 7, 2014 05:48 IST

शिवे, रौंधळवाडी, चोरघेवाडी, वाघू, साबळेवाडी, गवारवाडी, कासारी, कुदळेवाडी या गावांना नागरी सुविधा देण्यात याव्यात. पाणी परवाने, तसेच धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरी द्यावी

शिवे, रौंधळवाडी, चोरघेवाडी, वाघू, साबळेवाडी, गवारवाडी, कासारी, कुदळेवाडी या गावांना नागरी सुविधा देण्यात याव्यात. पाणी परवाने, तसेच धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरी द्यावी. या गावांचा आहे विरोध■ खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा, पराळे, रौंदळवाडी, अहिवळे, पाईट, शिवे, कासारी, वाघुची, साबळेवाडी, तोरणे, वाफगाव या गावांचा विरोध आहे. वाकी तर्फे वाडा, पराळे, रौंदळवाडी, अनावळे ही गावे पूर्णत: तर पाइट, शिवे, कासारी, वाघुची, साबळेवाडी, तोरणे, वाफगाव ही अंशत: बाधित आहेत. शेतकर्‍यांची जमीन घेऊन पुनवर्सनाचे आश्‍वासन न पाळल्याने या गावांत शासनाविरूद्ध रोष आहे. पिंपरी : आधी पुनवर्सन करा, नंतर प्रकल्प राबवा अशी भूमिका खेडमधील शेतकर्‍यांनी घेऊन बंदिस्त जलवाहिनीचे काम बंद पाडले आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध झाल्यानंतर भामा आसखेडमधून पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकर्‍यांच्या विरोधामुळे भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठीच्या जलवाहिनीचे काय होणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.पिंपरी-चिंचवड शहरास सध्या पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून हे पाणी रावेतपर्यंत आल्यानंतर महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्रातून सध्या प्रतिदिन ४५५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते, तर जलशुद्धिकरणाची क्षमता ५१५ दशलक्ष लिटर आहे. ८५ टाक्यांच्या माध्यमातून जलवाहिन्यांद्वारे १ लाख ३८ हजार ४५८ नळजोडांतून पुरवठा केला जातो. शहराची २0४१ मधील ३३ लाख ६८ हजार ५00 ही लोकसंख्या विचारात घेता प्रतिदिन आणखी ४६९ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे जवाहलाल नेहरू नागरी पुनरूत्थान (जेएनएनयूआरएम) अंतर्गत सुरूवातीला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव २00९ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानुसार कामही सुरू झाले. मात्र, शेतकर्‍यांनी कडवा विरोध केल्याने या कामास स्थगिती दिली आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून जिल्हा प्रशासन, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्याची योजना तयार केली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी त्यानुसार भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून प्रतिदिन ३७८ दशलक्ष लिटर उचलण्याचे नियोजन आहे. त्यांपैकी आंध्रा धरणातून १00 आणि भामा आसखेड धरणातून २00 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली आहे. संबंधित काम शेतकर्‍यांनी अडविले आहे. त्यामुळे शहरासाठी महत्त्वाच्या असणार्‍या भामा-आसखेड ते पिंपरी या जलवाहिनी प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी) ■ मावळप्रमाणे खेडमध्येही आता पाण्याचे राजकारण सुरू झाले आहे. जलवाहिनीचे काम सुरू झाल्याने गावांमधून विरोध व्हायला सुरूवात झाली आहे. त्यात गावपुढारी अग्रभागी आहेत. त्यांच्याकडून पाण्याचे राजकारण होत आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ज्या गावांना या योजनेची झळ पोहोचणार आहे. त्या गावांतील शेतकरीही आक्रमक होण्याच्या मार्गावर आहेत. प्रश्न चिघळण्यापूर्वी तो सामोपचाराने सोडवावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.