शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Video : अग्निशमन दलाच्या जवानांसाठी भाऊबीज; भोई प्रतिष्ठानचा उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 1:45 PM

वर्षभर चोवीस तास नागरिकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : वर्षभर चोवीस तास नागरिकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे या उपक्रमाचे 24 वे वर्ष होते. खासदार अनिल शिरोळे, जेष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, कारागृह विभागाचे विशेष पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव तसेच अनेक पुणेकर उपस्तिथ होते.

भोई प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्यांकडून पुणे अग्निशामक दलाच्या जवानांचे औक्षण करण्यात आले. तसेच यावेळी मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने उपस्थितांना शिरखुर्म्याचे देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. रजेवर असताना देखील आपले कर्तव्य बजावत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात अनिल शिरोळे म्हणाले, भोई प्रतिष्ठानच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते. समाज सुखी होत नाही तोपर्यंत आपण सुखी होत नाही. दुःखितांच्या दुःखात सहभागी होण्याचं काम भोई प्रतिष्ठान करते. तर उल्हास पवार म्हणाले, नवीन उपक्रम मिलिंद भोई नेहमी करत असतात. अनेक अग्निशमन दलाच्या जवानांनी सुट्टीवर असताना देखील कर्तव्य बजावून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. नेहमी नागरिकांच्या सेवेसाठी अग्निशमन दलाचे जवान आपले कर्तव्य बजावत असतात.

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीfire brigade puneपुणे अग्निशामक दल