"Betrayal with everyone ..."; Congress' lollipop agitation in Indapur to protest against fuel price hike | "सबके साथ, विश्वासघात.." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे 'लॉलीपॉप' आंदोलन

"सबके साथ, विश्वासघात.." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे 'लॉलीपॉप' आंदोलन

इंदापूर : केंद्रातील भाजपा सरकार हे व्यापारी विचाराचे सरकार आहे. संपूर्ण देश विकायला काढला असून, देशातील सर्वच शासकीय कंपन्या खासगीकरण चालू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या अत्यंत बिकट काळात देखील सरकार अत्यावश्यक असणाऱ्या पेट्रोलडिझेल व घरगुती गॅस याकडे नफेखोरीच्या नजरेतून बघत आहे, असा आरोप करत इंदापूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने 'लॉलीपॉप' आंदोलन करण्यात आले. 

शंभरीकडे चाललेला पेट्रोलडिझेल तसेच हजाराकडे चाललेला घरगुती सिलेंडरच्या किंमतीच्या विरोधात सोमवारी ( दि.२२ ) फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावर वाहन चालकांना 'लॉलीपॉप' वाटप करून निषेध नोंदवण्यात आला. 
   
सावंत म्हणाले की, सरकारने लावलेला भरमसाट कर कमी केला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या दिवसात महागाई नवा उच्चांक करेल व ह्यात सर्वसामान्य जनता भरडून निघेल, भाजपने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. असेही मत सावंत यांनी मांडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, सबके साथ विश्वासघात अशा घोषणा दिल्या. 

यावेळी काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत, पुणे जिल्हा सरचिटणीस जाकिर काझी, तालुका कार्याध्यक्ष काका देवकर, इंदापूर शहर अध्यक्ष रमजानभाई ( चमन ) बागवान, जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील, सुफियानखान जमादार, समीर शेख आदी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "Betrayal with everyone ..."; Congress' lollipop agitation in Indapur to protest against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.