शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan Scheme: एकदाच प्राप्तिकर भरलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ

By नितीन चौधरी | Updated: February 13, 2024 15:19 IST

थकबाकीची वसुली बंद, योजनेतील सोळावा हप्ता फेब्रुवारीअखेरीस मिळणार

पुणे : पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली. मात्र, केंद्र सरकारने यात आता बदल केला असून, केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा १६ वा हप्ताही मिळणार आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांकडून करण्यात येणारी ३० कोटी ४७ लाखांची वसुली आता थांबणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येक तिमाहीत दोन हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. यासाठी शेतकऱ्याच्या नावावर सात-बारा उतारा असणे आवश्यक आहे. त्याची नोंद महसूल विभागाच्या जमीन नोंदणी कागदपत्रांमध्ये गरजेची आहे. मात्र, केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार प्राप्तिकर भरणारे शेतकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ज्याचे उत्पन्न जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता. त्यामुळे या योजनेतून लाभ घेतलेल्या अशा अपात्र शेतकऱ्यांकडून या लाभाची वसुली करण्याचे काम सुरू होते.

निकष बदलले, शेतकरी वाढणार

पंतप्रधान किसान सन्मान योजना ही आता पूर्णत: कृषी विभागामार्फत राबवली जात असली तरी प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडील लाभाची वसुली करण्याचे काम महसूल विभाग करत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात असे २८ हजार ७६४ शेतकरी असून त्यांनी १ लाख ५२ हजार ३९२ हप्ते घेतल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार या शेतकऱ्यांकडून ३० कोटी ४७ लाख ८४ हजार रुपयांची वसुली करण्याचे आव्हान महसूल विभागाला होते. या वसुलीचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. काही शेतकऱ्यांनी ही वसुली ही थकबाकी परत केली, तरीदेखील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी थकबाकी भरली नव्हती. मात्र, केंद्र सरकारने आता या अटीत बदल केला आहे. त्यानुसार २०१९ पासून सलग दोन दोन वर्षे प्राप्तिकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, केवळ एक वेळाच प्राप्तिकर भरलेला असल्यास अशा शेतकऱ्यांना आता या योजनेत पात्र ठरविण्यात आले आहे.

थकबाकी घटणार

पीककर्जासाठी या शेतकऱ्यांकडून बँकांनी फॉर्म १६ भरून घेतल्याने हे शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले होते. मात्र, शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळणे बंद झाले होते. मात्र, अशा शेतकऱ्यांकडून आता ही थकबाकी वसूल केली जाणार नाही. तर, त्यांना यापूर्वीचे लाभ देण्यासही केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरून अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून संबंधितांना लाभ देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता पुणे जिल्ह्यातील थकबाकी केवळ एक कोटीच्या घरातच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यभरातही अशा प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोठी असून, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वसुलीची रक्कम मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव तो आता महिनाअखेरीस देण्यात येणार आहे. प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या यादीत असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही आता या यादीत समाविष्ट केले जाणार असल्याने सोळाव्या हप्त्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाSocialसामाजिकfoodअन्नvegetableभाज्या