शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 21:01 IST

कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देआदल्या दिवशीच बहुतांश सर्व शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण २ लाख ३८ हजार ४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ हजार ४३१ विद्यार्थी उपस्थित जिल्हा परिषद घेणार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळांची पहिली घंटा तब्बल आठ महिन्यांनंतर सोमवारी वाजली. जिल्ह्यातील ९ वी ते १२ वीच्या १हजार २४६ पैकी २१५ शाळा शासकीय नियमांचे पालन करत सुरू झाल्या. कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. २ लाख ३८ हजार ४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ हजार ४३१ विद्यार्थी उपस्थित होते. केवळ ४ टक्केच विद्यार्थी उपस्थित राहिले. उर्वरित शाळा येत्या १ डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत काही पालक सकारात्मक असले तरी काही पालकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे चित्र जिल्ह्यात होते.

राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारी (दि २३) जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. या बाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे, तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनिन कुऱ्हाडे उपस्थित हाेते.

सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने आदल्या दिवशीच बहुतांश सर्व शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचाचणी अनिवार्य करण्यात आली होती. जिल्ह्यात असलेल्या १५ हजार ८५४ शिक्षकांपैकी ६ हजार ५५६ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या चाचण्या रविवारपर्यंत पूर्ण झाल्या. यापैकी २९ जण पॉझिटिव्ह आढळले.

स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. सर्व शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यास वेळ लागणार आहे. मात्र, तपासणीचे काम पूर्ण करून येत्या १ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा सुरू केल्या जातील, असे शिक्षण अधिकारी गणपत मोरे यांनी सांगितले.

मोरे म्हणाले, पहिल्या दिवशी शासकीय नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची तपासणी करून शाळेत सोडण्यात आले. ऑक्सिमिटर आणि थर्मामिटरच्या साह्याने तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना एक बाक सोडून बसविण्यात आले. शाळा काही तास सुरू राहणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना एकमेकांच्या जवळ येऊ दिले जाणार नाही. मधली सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. मैदानी वर्गही रद्द करण्यात आले आहेत. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना थेट घरी पाठवले जाणार आहे.————१० हजार ५०० पालकांनी भरले संमती पत्रशाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमती पत्र मागवण्यात आले होते. जवळपास १० हजार ५०० पालकांनी हे पत्र शिक्षण विभागाला पाठवले. यात काही पालक हे शाळा सुरू करण्यास अनुकूल होते. तर काही पालकांच्या मते लस येईपयर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी करत पाल्यांना शाळेत पाठवणार नसल्याचे म्हटले आहे.

जिल्हा परिषद घेणार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारीकोरोनाचा संसर्ग होईल या भितीने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा परिषद पूर्णपणे खबरदारी घेत आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत कोरोनाची लागण झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद स्विकारेल अशी माहिती अध्यक्ष निर्मला पानसरे व उपाध्यक्ष रणजित शिवत यांनी दिली. शिवतरे म्हणाले, नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, मात्र पुढील काही दिवसांमध्ये ही संख्या वाढेल. याशिवाय सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात आलेली आहे. सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करण्यात आले. तरी देखील विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याची उपचाराची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.——-चौकटजिल्ह्यातील शाळा दृष्टीक्षेपातशाळा - १२४६शाळा सुरू - २१५शिक्षक - ११०३३शिक्षकेतर कर्मचारी - ४८२१एकूण विद्यार्थीसंख्या - २३८०४१चौकटतालुका सुरू झालेल्या शाळांची संख्याबारामती ३भोर १०दौंड ६हवेली ३७इंदापूर ३३जुन्नर २०खेड १६मावळ १४मुळशी १५पुरंदर ३६शिरूर ८आंबेगाव १०वेल्हा ७

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद