शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू; मुख्यमंत्री शिंदेंचे पुणेकरांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:51 IST

विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, तेव्हा सहकार्याची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिलाय. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होतीये. पुण्याच्या नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांचे संसार पाण्यात वाहून गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची दखल घेत पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागाला भेट दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे, राज ठाकरे, मुरलीधर मोहोळ, आदित्य ठाकरे यांनीसुद्धा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. आज राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे पुरग्रस्तांशी चर्चा कारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपुणे दौऱ्यावर आहेत. सांगवीत नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेटला भेट दिली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी या भागातील नागरिकांना शब्द दिला आहे. तुम्ही विश्वास ठेवा आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले, तुमच्या घराचा त्रास आता दूर झाला पाहिजे असं धोरण करायचं आहे. आपल्याला तात्पुरती मदत मिळते हे ठीक आहे. परंतु कायमस्वरूपी पुराचा धोका दूर करण्याचं काम सरकार करणार आहे. म्हणून सरकारच्या वतीने धोरण आणू, नवीन डीसीआर आणू, विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. मी जे बघण्यासाठी आलो आहे. त्याचे योग्य प्रकारे नियोजन करू. तुम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची आहे. आपल्याला संकटात सगळ्या लोकांनी मदत केली. आपल्या सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार तेव्हा मदतीला आले. महापालिका, आर्मी, एनडीआरएफ, एनजीओ सन्था सगळ्यांनी मदत केली. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही विश्वास ठेवा, खात्री बाळगा आपण नक्कीच कायस्वरूपी तोडगा काढू. आता आम्ही पूरग्रस्त भागातील नागरिकांना काही कमी पडू देणार नाही. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका