शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

करडेला ओढा खोलीकरणास सुरुवात

By admin | Updated: June 13, 2015 22:29 IST

करडे (ता. शिरूर) येथे लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या अंतर्गत ओढा खोलीकरणाच्या कामास नुकताच शुभारंभ झाला.

निमोणे : करडे (ता. शिरूर) येथे लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या अंतर्गत ओढा खोलीकरणाच्या कामास नुकताच शुभारंभ झाला.या वेळी गावालगत असणाऱ्या सार्वजनिक बारवेलगतच्या ओढ्याचे खोलीकरण सुरू झाले. या खोलीकरणामुळे लगत असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. या कामासाठी संबंधीत खात्याने मोफत मशिन आणि इंधनखर्च दिला आहे. सार्वजनिक कामाशिवाय शेतकऱ्यांनी अशा कामासाठी मागणी केल्यास मशिन त्यांना मोफत मिळू शकते.गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी या भागात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी तत्कालीन सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील यांच्या पुढाकाराने मोठी जलसंधारणाची कामे झाली होती. यामध्ये पाझर तलावातील गाळ काढणे, ओढ्यांचे खोलीकरण, पाझर तलाव उभारणी, बांधबंदिस्ती, समतल चर निर्मिती अशी अनेक कामे झाली, त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली आहे.या ओढाखोलीकरणाच्या प्रारंभी माजी सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील, उपसरपंच गणेश रोडे, लंघेवाडीचे माजी सरपंच संतोष लंघे, भास्कर वाळके, अरुण जगदाळे, अल्ताफ शेख, शेख लाल तांबोळी, सुनील बांदल, भास्कर जगदाळे, बाळासाहेब वाळके, युवराज निंबाळकर, कृषी सहायक के. एन. सात्रस इ. मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.