शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाद मिटवण्यासाठी बोलवून तरुणीला मारहाण; तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा

By नितीश गोवंडे | Updated: June 20, 2024 13:13 IST

तीन तरुणांनी तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय

पुणे: मैत्रीमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवून घेत तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ११ मार्च व २२ मे रोजी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंग मध्ये व वडारवाडी येथील दीप बंगला चौकात घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३२ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. १९) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रतीक बाळकृष्ण काकडे (३०), प्रज्योत बाळकृष्ण काकडे (३२, रा. बालाजी अपार्टमेंट, नवी सांगवी) आणि आश्विन पवार (२९, रा. वसई) यांच्यावर विनयभंगासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय कार्यालयात काम करतात. आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात वाद झाले होते. मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतीक याने फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बोलवून घेतले. फिर्यादी तिथे गेल्या असता आरोपी प्रज्योत त्याठिकाणी होता. त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या दुसऱ्या ऑफिसकडे निघाल्या.

आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन दीप बंगला चौकात अडवून शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर फिर्यादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतीक याने बोलवून घेतले. त्यावेळी आरोपींनी अश्लील बोलून शिवीगाळ केली. तर प्रज्योत आणि आश्विन यांनी फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील या करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग