चार महिन्याच्या सायबेरियन जातीच्या कुत्र्याला मारहाण; एका विरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 11:27 IST2023-05-19T11:26:48+5:302023-05-19T11:27:12+5:30

कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

beating a four month old siberian dog case was filed against one | चार महिन्याच्या सायबेरियन जातीच्या कुत्र्याला मारहाण; एका विरुद्ध गुन्हा दाखल

चार महिन्याच्या सायबेरियन जातीच्या कुत्र्याला मारहाण; एका विरुद्ध गुन्हा दाखल

किरण शिंदे, पुणे: अवघे चार महिने वय असलेल्या एका सायबेरियन हस्की जातीच्या श्वानाला चप्पल आणि लाथाने मारहाण करत क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पद्मिनी पीटर स्टंप (वय 65) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जुनेद शेख (ए 708, ईरा सोसायटी उंड्री) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या प्राणीमित्र असून त्या एका एनजीओ साठी काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या व्हाट्सअप वर एक व्हिडिओ आला होता. त्यामध्ये जुनेद शेख यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या पांढऱ्या रंगाच्या सायबेरियन हस्की जातीच्या चार महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला चप्पल आणि लाखाने मारहाण केली. क्रूर वागणूक देऊन त्यांनी त्या कुत्र्याला जखमी केले आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: beating a four month old siberian dog case was filed against one