Pune Crime: पिझ्झा उशिरा आल्याने केला गोळीबार, एकाला अटक; पुण्यातील घटना

By नम्रता फडणीस | Updated: October 25, 2023 11:09 IST2023-10-25T11:08:21+5:302023-10-25T11:09:41+5:30

हा प्रकार सोमवारी (दि.२३) रात्री ११.१५ वाजता वाघोली परिसरात घडला.....

Beat up for late pizza; Both were threatened with a pistol pune crime | Pune Crime: पिझ्झा उशिरा आल्याने केला गोळीबार, एकाला अटक; पुण्यातील घटना

Pune Crime: पिझ्झा उशिरा आल्याने केला गोळीबार, एकाला अटक; पुण्यातील घटना

पुणे : पिझ्झाची ऑर्डर उशीरा आल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना घराबाहेर काढत गाडीतून पिस्टल काढून वरच्या दिशेने गोळीबार केलेल्या एकाला सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२३) रात्री ११.१५ वाजता वाघोली परिसरात घडला.

चेतन वसंत पडवळ असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित राजकुमार हुलसुरे या ( रा. समर्थ कृपा बिल्डिंग) आणि बापुसाहेब पठारे (खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी च्या डोमिनोज पिझ्झा मधून आरोपीने पिझ्झा मागविला होता. मात्र पिझ्झा उशीरा आल्याच्या कारणावरून त्याने डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी दोघांसमवेत आरोपीच्या घरी गेले. आरोपीने दरवाजा उघडून 'तुम्ही इथे का आलात म्हणत फिर्यादीची कॉलर पकडून त्याला घराबाहेर काढले आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीतून पिस्टल काढून ते लोड करून वरच्या दिशेने गोळीबार केला.

यामुळे वरच्या मजल्यावरील एखाद्या व्यक्तीला गोळी लागून मृत्यू ओढवू शकतो याची जाणीव असूनही आरोपीने हे कृत्य केल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.

Web Title: Beat up for late pizza; Both were threatened with a pistol pune crime