कोरोनाशी लढण्यासाठी मदत कराच! पण ती योग्य जागी पोहचेल याची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:52 AM2020-03-31T11:52:45+5:302020-03-31T11:54:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत निधीत साह्य करण्याचे आवाहन

Be careful that help goes at the right place in during corona fight | कोरोनाशी लढण्यासाठी मदत कराच! पण ती योग्य जागी पोहचेल याची काळजी घ्या

कोरोनाशी लढण्यासाठी मदत कराच! पण ती योग्य जागी पोहचेल याची काळजी घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देअर्धा डझन वेबसाईट बनावट : खात्री केल्यावरच ऑनलाईन पाठवा पैसे 

विवेक भुसे - 
पुणे : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, त्याच्याशी लढण्यासाठी सर्व जण लॉकडाऊनचा हत्यारासारखा वापर करत आहे. या युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची गरज भासणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत निधीत साह्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अनेक जण त्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, ही मदत करताना ती योग्य जागी पोहोचेल याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर अ‍ॅट एसबीआय याची माहिती जाहीर करताना काही वेळात त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या अर्धा डझन वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या भारताच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक(एनपीसीएससी) लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांनी सायबर गुन्हेगारांना कडक इशारा देताना सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी सध्याच्या कोविड -१९ या संकटाचा गैरफायदा घेऊ नये आणि आर्थिक फसवणूक न करण्याचा इशारा दिला आहे. जनरल पंत यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा बोलबाला सुरु झाल्यानंतर गेल्या २ महिन्यात कोरोना व्हायरसशी संबंधित जवळपास ४ हजार फ्रॉड पोर्टल जगभरातील सायबर गुन्हेगारांनी त्या तयार केल्या आहेत.अशा संकटाच्या काळातही सायबर गुन्हेगार संधी शोधत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर या साईटची घोषणा केली. ती लोकांपर्यंत पोहचण्यापूर्वी काही वेळात त्याच्याशी साधर्म्य दर्शविणाºया अर्धा डझन वेबसाईट तयार करण्यात आल्या होत्या. सुदैवाने आमच्याकडे त्याला अडविणारी कार्यक्षम यंत्रणा आणि सीईआरटी इन सारखी संस्था आहे. तसेच अशा प्रकारच्या साईटपासून संरक्षण करण्यासाठी बँक कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत़ अनेकांची कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदत देण्याची इच्छा आहे़ ही मदत कशी देता येईल, याबाबत चौकशी करीत असतात़ अनेकांना ई मेल, मेसेज येऊ लागले आहेत़ मात्र, ते खरेच असतील याची अगोदर खात्री करण्याची आवश्यकता आहे. तसेच पीएम केअर या नावाने एक बनावट युपीआय डोमिन तयार करण्यात आल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर सायबर क्राईमच्या  पोलिसांनी तो ब्लॉक केला आहे़. त्यामुळे कोणतीही मदत देताना तुम्हाला एकदा मेल अथवा मेसेज आला व त्यावरुन दिलेल्या डोमिनवर तुम्ही मदत करु नका़ कदाचित ती फेक असण्याची शक्यता आहे.
..........
सायबर गुन्हेगार कोणती कल्पना लढवून कशा प्रकारे फसवणूक करतील, याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो़. फसवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे हजार कारणे तयार असतात. त्यामुळे आपली मदत व इतर गोष्टींसाठीही योग्य लिंकचा वापर करावा आणि आपले व्यवहार करावेत़
- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुण

Web Title: Be careful that help goes at the right place in during corona fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.