काळजी घ्या! पुण्यात जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा अचानक बेशुद्ध पडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 11:28 IST2022-03-16T11:16:41+5:302022-03-16T11:28:12+5:30

मृत्यू प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद

Be careful! A young man died after falling unconscious while exercising in a gym in Pune | काळजी घ्या! पुण्यात जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा अचानक बेशुद्ध पडून झाला मृत्यू

काळजी घ्या! पुण्यात जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा अचानक बेशुद्ध पडून झाला मृत्यू

पिंपरी :व्यायाम करीत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुनावळे येथे सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अनमोल गोजा (वय २३, सध्या रा. पुनावळे, मूळ रा. जम्मू) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल गोजा हा तरुण पुनावळे येथे एका फिटनेस क्लबमध्ये (जिम) व्यायामासाठी गेला होता. त्यावेळी तो अचानक बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यू प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक प्रकार घडले आहेत. व्यायाम करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच अनावश्यक विविध पावडर घेणेही टाळले पाहिजे. आजकाल तरूण तब्येत लवकर चांगली होते या आशेने बाजारात उपलब्ध असणाऱ्या पावडर घेतात, जे आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकतात.

Web Title: Be careful! A young man died after falling unconscious while exercising in a gym in Pune