बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 05:37 PM2020-04-02T17:37:45+5:302020-04-02T17:38:51+5:30

पुणे स्टेशन परिसर, मालधक्का, शिवाजीनगर, हडपसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांची अन्नपाण्याची व्यवस्था.

Barty becomes donate of foods for homeless, destitute people ! The banquet will be served until the lockdown period | बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था

बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर

धनाजी कांबळे - 
पुणे : देशात लॉकडाउन असल्याने अनेक ठिकाणी बांधकाम मजूर, कष्टकरी, हातावर पोट असलेले लोक अतिशय कठिण परिस्थितीत जगत आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर निराधार, गरीब लोक अन्नपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा गरीब, कष्टकरी, कामगारांसाठी अन्नदाता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुढे आली आहे.
कोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या काळात बेघरांसाठी, अनाथांसमोर अन्नपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, या सामाजिक जाणीवेतून बाटीर्ने या काळात अन्नपाणी पुरवण्याचे काम हातात घेतले आहे.बार्टीचे संचालक कैलास कणसे, निबंधक यादव गायकवाड आणि त्यांची टीम यासाठी विशेष प्रयत्न करीत असून, साठी अन्नपाण्याची व्यवस्था येरवड्यातील निवासी शाळेच्या भोजनालयात जेवण तयार करून दररोज सायंकाळी साधारण ५०० ते ६०० लोकांना जेवण पुरवण्यात येते. यासाठी बार्टीमध्ये काम करीत असलेले कर्मचारीच एकदिवसाआड कामावर येऊन पुरेशी काळजी आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे काम करीत आहेत.
त्याचप्रमाणे केवळ द्यायचे म्हणून नव्हे, तर गरीब असले तरी ती हाडामांसाची माणसेच आहेत, याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीतून जेवणाची गुणवत्ता तपासून उत्कृष्ट दजार्चे जेवण दिले जाते. त्यासाठी तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली असून, बेघर व गरीब वस्त्या, झोपड्यांजवळ थांबून अधिकारी व कर्मचारी हे भोजनाची व्यवस्था करीत आहेत.
पुणे स्टेशन परिसर, महापालिकेचे निवारा केंद्र, मालधक्का, महापालिका परिसर, शिवाजीनगर, हडपसर येथील रामटेकडी परिसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांना अन्नपाण्याची व्यवस्था केली जात आहे. ५०० ते ६०० लोकांना सध्या अन्नदान केले जात असून, मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे फूड पॅकेट्स आणि पाणी यांची संख्याही वाढविण्याचा विचार आहे. प्रकल संचालक नितीन सहारे, सहा. प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, सुरक्षा रक्षक सुपरवायझर बाळासाहेब ढमाले, सुरक्षारक्षक गोपाळे, दर्शन सकट, वाहनचालक विश्वनाथ दोंडगे, सखाराम कदम, प्रदीप भालेराव यांच्यासह अनेक कर्मचारी या कामात स्वत:हून एकदिवसआड सहभागी होत आहेत.
---
कोरोनाचे संकट देशावरच आल्याने लॉकडाउनची स्थिती आहे. या काळात गरीब, निराधारांची अन्नपाण्यावाचून फरपट होऊ नये, यासाठी सामाजिक जाणीवेतून आम्ही दररोज ५०० ते ६०० जणांना भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही अन्नपाणी पुरवत आहोत. आपत्तीच्या काळात सर्वांनीच अशा निराधार माणसांचा आधार बनायला हवं. आम्ही बार्टीच्या वतीने जेवढे शक्य आहे, तेवढं करीत आहोत.
- कैलास कणसे, महासंचालक, बार्टी
---

Web Title: Barty becomes donate of foods for homeless, destitute people ! The banquet will be served until the lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.